मालवणात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन साजरा

“बाळासाहेब अमर रहे” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला ; नागरिकांना कल्पवृक्षाचे वाटप

मालवण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने येथील पक्ष कार्यालयात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ‘अमर रहे अमर रहे, बाळासाहेब अमर रहे’…. अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. मालवण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यालय येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिवादन केले.

या निमित्ताने नागरिकांना कल्प वृक्षाचे वाटप करण्यात आले. माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी यावेळी बाळासाहेबांच्या आठवणीना उजाळा दिला. या प्रसंगी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, मंदार केणी, सन्मेश परब, पंकज सादये, किरण वाळके, नरेश हुले, यशवंत गावकर, मनोज मोंडकर, चंदू खोबरेकर, वासुदेव गावकर, उमेश मांजरेकर, दीपक देसाई, बंड्या सरमळकर, दिलावर शेख, बाळा परब, विशाल भगत, गिरीष कांबळी, दिगंबर बगाड, दादू शिर्सेकर, बाबा मडये, दीपा शिंदे, तृप्ती मयेकर, निना मुंबरकर, रश्मी परुळेकर, अंजना सामंत, नंदा सारंग, लक्ष्मी पेडणेकर, मीनाक्षी शिंदे यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!