“थर्टीफर्स्ट” चं औचित्य साधून “त्यांनी” अनाथांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद !
आनंदाश्रय आश्रमातील निराधारांसमवेत संगीतमय सायंकाळ
कट्टा येथील आभाळमाया ग्रुपचा आणखी एक अभिनव उपक्रम
कुणाल मांजरेकर
मालवण : सामाजिक क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या “आभाळमाया” ग्रुपने ३१ डिसेंबरचे औचित्य साधून अणाव येथील “आनंदाश्रय” आश्रमात संगीतमय सायंकाळ साजरी करत निराधारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला.
ग्रुपच्या सदस्य श्रीमती नम्रता डिचोलकर यांच्या सहकार्याने त्यांचे पुत्र कु. चंद्रशेखर याच्या विवाहानिमित्त आणि नूतन वास्तूप्रवेशा निमित्त यावेळी अन्नदान करण्यात आले. “आभाळमाया” ग्रुपचे सदस्य आनंद आचरेकर यांनी आपले बंधू कै. प्रवीण आचरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत विशारद संजय दळवी, छोटू ढोलम, संकेत मेस्त्री, नंदन म्हाडगूत, विवेक सावंत यांचा भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात “आभाळमाया” ग्रुपचे सदस्य नितीन शेट्ये, प्रवीण मिठबावकर, प्रदीप मिठबावकर, समीर रावले, राकेश डगरे आदी उपस्थित होते.