१२ सप्टेंबरला दादरहून कुडाळकडे निघणार विशेष रेल्वे
मुंबई : गणपती सणानिमित्त मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या कुटुंबीयांसोबत कोकणात जाता यावे, यासाठी शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही ‘शिवसेना एक्सप्रेस’ विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. ही विशेष रेल्वेगाडी शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून कुडाळच्या दिशेने रवाना होणार आहे.
कोकणात जाऊन कुटुंबीयांसोबत गणपती सण साजरा करता यावा, या उद्देशाने आमदार निलेश राणे यांच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो या प्रवासासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून प्रवास पूर्णपणे मोफत आहे. तसेच बुकिंगसाठी कोणालाही कोणताही मोबदला देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. बुकिंग अहस्तांतरणीय असून प्रवासासाठी सरकारी ओळखपत्र अनिवार्य आहे.
सीट बुकिंगसाठी ८४२५९०१२०२ / ८४२५९०१५४५ या क्रमांकाशी संपर्क साधावा. बुकिंगची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते सायंकाळी ५ ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या मायभूमीशी जोडण्यासाठी ‘शिवसेना एक्सप्रेस’चा हा उपक्रम यंदाही कोकणवासीयांसाठी विशेष ठरणार आहे.