
पुरुष, महिला अन् लहान गटातील विजेत्यांचा रोख पारितोषिकांनी गौरव
मालवण : महान येथील संग्राम साळसकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित आणि शिवसेना पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा महान येथील महापुरुष मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली. नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेला ग्रामस्थांसह शिवसैनिक आणि स्पर्धाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत पुरुष, महिला आणि लहान गट अशा तीन गटांत चुरशीच्या लढती रंगल्या. पुरुष गटात विक्रांत घाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावत ३ हजार १ रुपयांचे पारितोषिक मिळविले. अशोक जाधव यांनी द्वितीय क्रमांक मिळवत २ हजार १ रुपयांचे पारितोषिक पटकावले. महिला गटातही स्पर्धेचा चांगलाच रंग भरला. शर्मिला घाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवत ३ हजार १ रुपयांचे पारितोषिक पटकावले. उल्का नेरकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवून २ हजार १ रुपयांचे पारितोषिक मिळविले. तर लहान गटात आयुष घाडी याने प्रथम क्रमांक मिळवत १ हजार १ रुपयांचे पारितोषिक पटकावले. समर्थ साळुंखे याने द्वितीय क्रमांक मिळवत ५०१ रुपयांचे पारितोषिक मिळविले.विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या उपस्थितीत रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या निमित्ताने महान गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, माजी सभापती सुधीर साळसकर, मंगेश साळसकर, महान गावचे सरपंच अक्षय तावडे, उपसरपंच अजित राणे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद जाधव, सागर शिंदे, महिला सदस्य चैताली शिंदे, अंजली हळवे, माजी सरपंच सुहास साळुंखे, मदन घाडी, शिवसेना शाखाप्रमुख श्यामा घाडी, रवींद्र साळसकर, रेजन घाडी, संदीप राणे, निळकंठ घाडी, दिनेश घाडी, अक्षय जाधव, गौरव राणे, प्रशांत साळुंखे, सुरेश घाडी, राजू घाडी, दीपक घाडी, सुरेश चव्हाण, सोनू शिंदे, तात्या नेरकर, विद्या नेरकर, बाबू नेरकर, संदीप शिंदे, चेतन साळसकर, शुभम हळवे, ओंकार शिंदे, शुभम शिंदे, मंदार शिंदे, प्रणव शिंदे, आदित्य घाडी, रोहन घाडी, नीता चव्हाण, वर्षा शिंदे, वैष्णवी घाडी, रसिका नेरकर, कोमल गावडे आदी ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि स्पर्धकांच्या चुरशीच्या लढतीमुळे महानमधील नारळ लढविणे स्पर्धा लक्षवेधी ठरली.






Subscribe to my channel






