चिवला बीच येथील १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादात सुरुवात

अश्विन कुमार, अनुजा उगले यांना वेगवान जलतरणपटूचा बहुमान ; महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे भव्य आयोजन

मालवण : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने मालवण चिवला बीच येथे आयोजित १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत पहिल्या दिवशी मुलांच्या गटात ठाणेच्या अश्विन कुमार तर मुलींच्या गटात नाशिकच्या अनुजा उगले यांनी वेगवान जलतरण पटूचा बहुमान मिळविला. मुलांच्या गटात ठाणेच्या तनय लाड व मुलींच्या गटात बेंगलोर येथील पी. वेणाश्री यांनी उपविजेता चषक देऊन सन्मानित करण्यात आले. पहिल्या दिवशी विविध गटात सुमारे मोठया संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. उत्स्फूर्त अश्या प्रतिसादात आणि भव्यदिव्य आयोजनात पहिल्या दिवशी स्पर्धा संपन्न झाली.

स्पर्धेचे उदघाटन सकाळी राज्य जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर व जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी डॉ. तपन पानेगिरी, राष्ट्रपती अवार्ड राष्ट्रीय जलतरणपटू रुपाली रेपाळे, डॉ. राहुल पंतवालावलकर, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर, कृष्णा ढोलम, महेश कदम, राधिका परब, ज्योत्स्ना परब, उद्योजक बंडू कांबळी, युसूफ चुडेसरा, सचिन शिंदे, किशोर पालकर, निल लब्दे, अरुण जगताप, समीर शिर्सेकर, डॉ. सचिन शिंदे, सुनील मयेकर, आदित्य डोयले, साहिल पालकर, इशिका पालकर, दीपाली डोईले, प्राची डोईले, राधिका पालकर, छाया डोईले, योगिता महाकाळ यांसह अन्य आयोजक व मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष दिपक परब यांनी सर्व सहभागी खेळाडूंना व सर्व पालक व प्रशिक्षक यांना शुभेच्छा दिल्या. तुम्हा सर्वांमुळे ही स्पर्धा यशस्वी होत असल्याचे सांगून ते म्हणाले, स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावर अधिक गुण प्राप्त करण्याची संधी ही उपलब्ध होते. याचाही विचार करून अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे. असेही आवाहन त्यांनी केले.

आठ राज्यामधील स्पर्धक आणि महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्हे यातील सुमारे 1500 स्पर्धक यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटने तर्फे 10 किलोमीटर स्पर्धा व 1 किलोमीटर, 2 किलोमीटर फिन्स स्विमिंग स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा पुर्ण झाल्यानंतर ऑल इंडिया फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप होऊन पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल, सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट कॅप देण्यात येत आहे तसेच ग्रुपमध्ये विजेत्याना रोख बक्षीस, अन्य भेट वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. एकूण आठ लाख रक्कमेची पारितोषिक, भेटवस्तू आहेत.

स्पर्धेचा उर्वरित निकाल

२ किलोमीटर फिन्स मुले- रणबीरसिंग गौर (नागपूर), आलोक जाधव (नाशिक), अथर्व भेडे (नागपूर), अक्षत सावंत (ठाणे), बाळकृष्ण येरम (मुंबई), स्मित सावला (नाशिक), सुहास काळे (नाशिक), श्रेयस पराडकर (रायगड), केतन कुलकर्णी (पुणे), आकाश कोटिया (गुजरात)

२ किलोमीटर फिन्स मुली अनुक्रमे- जान्हवी धामी (मुंबई), स्वराली वानखेडे (नाशिक), निधी बोरीकर (नागपूर), अरुंधती सोनाव (पुणे), समीक्षा वेरुळे (बीड), राजनंदिनी चाटे (बीड), राजेश्वरी गायकवाड (पुणे), शर्वरी हजारे (पुणे), पायल मोरे (नाशिक), वैदेही पोतदार (मुंबई)

१ किलोमीटर फिन्स मुले अनुक्रमे- ध्रुव धामणे (नाशिक), रुद्र मोरे (मुंबई), अरहान खान (नागपूर), श्रीदत्त पुजारी (बेळगाव), श्रीनिक भामबेरे (पुणे), परम वाघ (नाशिक), हर्षद जाधव (नाशिक), विराज पोमन (नाशिक), शिवंश पाटील (नाशिक), अर्जुन वाबळे (नाशिक)

१ किलोमीटर फिन्स मुली अनुक्रमे- अकिरा खोत (पालघर), वसुंधरा कसबे (नाशिक), मनस्वी सोनावणे (पुणे), साची बंदाबे (पुणे), प्राजक्ता सुर्वे (मुंबई), सायली घुग्रेतकर (बेळगाव), अद्या म्हात्रे (ठाणे), अनुभा सोरटे (नागपूर), संहिता करमरकर (सातारा), श्रावणी कुलकर्णी (पुणे)

१० किलोमीटर मुले अनुक्रमे- अश्विन कुमार (ठाणे), चैतन्य शिंदे (पुणे), वरद कुवर (नाशिक), रुद्र मानडे (कोल्हापूर), सागर कांबळे (पुणे), अनुज उगले (नाशिक), भाग्येश पालव (सिंधुदुर्ग), पुष्कर शेळके (नाशिक), साईश मालवणकर (ठाणे), विश्वा शिंदीकर (नाशिक),

१० किलोमीटर मुली अनुक्रमे- अनुजा उगले (नाशिक), मिहिका कोळंबेकर (मुंबई), स्वरा सावंत (ठाणे), चित्रानी नवले (सातारा), सुरभी शिंदे (मुंबई)

१० किलोमीटर गट दुसरा मुले अनुक्रमे- तनय लाड (ठाणे), श्लोक कोकणे (ठाणे), अबीर मांडवकर (ठाणे), प्रतुल्य झगडे (ठाणे), अबीर साळसकर (ठाणे), आरव आहुजा (ठाणे), निर्भय भारती (ठाणे), देव रजपूत (नंदुरबार), मयांक म्हात्रे (रायगड), दर्श बिलोरिया (ठाणे) मुली अनुक्रमे- पी वेण्याश्री (बेंगलोर), रेवा परब (ठाणे), हर्षदा चौधरी (ठाणे), गीतिशा भंडारे (ठाणे), प्रिशा वर्मा (ठाणे), अथश्री भोसले (ठाणे), विधी भोर (ठाणे), श्री शेट्टी (ठाणे), सई मुंडे (पुणे), स्पृहा उशिकर (ठाणे)

कनिष्ठ गट १ किलोमीटर मुली अनुक्रमे- आर्या हिरवे, समीप्ता वाव्हल, अस्मि चौधरी, मुलगे- रेयांश खामकर, राजवीर फरांदे, सिद्ध मुप्पीनेस्ती, मुली- विहा चौहान, साजिरी पाटील, मास्टर वो पुरुष- प्रदीप नासकर, आशिष रंजन, अक्षय पवार,

२ किलोमीटर पुरुष- विरमनी मनोहरन, ज्ञानेश वानडे, खंतील दीक्षित, पुरुष- प्रसाद काजबजे, सुदेश पत्की, १ किलोमीटर पुरुष- शिरीष पत्की

कनिष्ठ गट २ किलोमीटर मुली- मेधस्वी परात्ने, मुलगे- उदित मलिक, लेना प्रनेश, मुलगे- रणबीरसिंग गौर, ध्रुव धामणे, निल पत्की, मुली- ओवी पवार, मुलगे- सुयश हिंदळेकर, सूर्या मंडल, त्रिग्या मुन, मुली- अस्मि हिरवे, शफझा शाहिद, ऐशी चक्रवर्ती,

१ किलोमीटर मुलगे- बाळकृष्ण येरम, आरव भारद्वाज, शिवंश पाटील. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ऑटोमेटीक टायमिंग सिस्टीम

आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे यावर्षीपासून या स्पर्धेत ऑटोमेटीक टायमिंग सिस्टीम टच पॅड वापरण्यात आली. स्पर्धकांकडे रिस्ट वॉच स्कॅन होऊन वेळ नंबर त्यावर नोंद झाली. एकूणच अधिक नवे बदल करून एक दर्जेदार असे या स्पर्धेचे स्वरूप ठरले.

रविवारी होणाऱ्या स्पर्धा

स्पर्धच्या दुसऱ्या दिवशी 14 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जलतरण संघटना राज्यस्तरीय स्पर्धा 500 मिटर एक किलोमीटर, दोन किलोमीटर, तीन किलोमीटर, पाच किलोमीटर या सर्व ग्रुपची स्पर्धा होणार असूनह् त्याचे पारितोषिक वितरण होणार आहे.

error: Content is protected !!