सिंधुदुर्ग जिल्ह्य काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न करणार : मोंडकर
मालवण : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने संघटन सृजन अभियान अंतर्गत विविध जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी मालवण येथील अरविंद मोंडकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्या सहीने पाठविण्यात आले आहे.
लोकशाही आणि संविधान मजबूत करण्यासाठी सर्वमान्य असे गांधी – नेहरू यांचे विचार दृढ करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा जपण्यासाठी येणाऱ्या काळात अधिक जोमाने काम करण्याची संधी पक्ष नेतृत्वाने मला दिली आहे. तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी माझ्यावर विश्वास दाखवला यासाठी सर्वांचे आभार मानत असून आता सिंधुदुर्ग जिल्ह्य काँग्रेसमय करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे.