
गतिमान विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध
आ. राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टर नियुक्ती
शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, आंबा काजु बागायतदार, दशावतार कलावंत या सर्वाना न्याय मिळवून देताना ठरले विधानसभेतील जनतेचा आवाज
मालवण : मागील दीड वर्ष कुडाळ मालवणचा आमदार म्हणून काम करताना निलेश राणे यांनी प्रत्येक अधिवेशनात आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने छाप पाडली आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार राणे यांनी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न तडीस नेले असून आ. राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टर नियुक्ती देखील करण्यात आली आहे. याबद्दल समस्त मालवण वासियांच्या वतीने नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी आ. निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
गतिमान विकासातून कुडाळ मालवण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नाशील असून शेकडो कोटी निधी मतदारसंघात प्राप्त झाला आहे. २१ व्या शतकातील आदर्श असे मालवण मालवण शहर घडवणार या संकल्पनेतून मालवण शहराच्या विकासासाठीही सातत्याने मोठा निधी आमदार निलेश राणे उपलब्ध करून देत आहेत. सोबतच जनतेला तत्पर सेवा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठीही आमदार निलेश सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टर नियुक्ती झाली आहे. मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध आहेत असे सांगत मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी मालवणवासीय जनता, उपनगराध्यक्ष व महायुतीच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने आमदार निलेश राणे, महायुती सरकार तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.
ममता वराडकर यांनी सांगितले, नमो उद्यान, रॉक गार्डन सुशोभीकरण, मामा वरेरकर नाट्यगृह अत्याधुनिक सुविधा व नूतनीकरण यांसह विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. जनहिताच्या दृष्टीने अनेक विकास प्रकल्प प्रस्तावित आहेत. सोबतच सिंधुदुर्गनगरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मालवण शहर देऊळवाडा रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी तब्ब्ल 302 कोटी निधी मंजूर करून आणला. आमदार निलेश राणे यांच्या रूपाने व्हिजन असलेले नेतृत्व मालवण कुडाळ मतदार संघाला लाभले असून विलासकामातून मतदारसंघ प्रगतीपथावर आहे. असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.
विधानसभेतील जनतेचा आवाज
आपल्या अभ्यासपूर्ण आणि ठाम भूमिकेतून जनतेचे प्रश्न प्रत्येक अधिवेशनात प्रभावीपणे मांडून सर्व स्तरातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य आमदार निलेश राणे सातत्यपूर्ण करत आहेत. शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, आंबा काजु बागायतदार, दशावतार कलावंत यां सर्वाना न्याय मिळवून देताना आ. निलेश राणे म्हणजे विधानसभेतील जनतेचा आवाज ठरले आहेत. असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.





Subscribe to my channel






