मालवण उपनगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून दीपक पाटकर यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र ; बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मालवण : मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना व भाजप एकत्र आल्याचे चित्र आज पालिकेत दिसून आले. उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचे शहरप्रमुख तथा दोनवेळा निवडून आलेले अभ्यासू नगरसेवक दीपक पाटकर यांनी मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर, शिवसेना गटनेत्या पूनम चव्हाण, नगरसेविका मेघा गावकर, निना मुंबरकर, शर्वरी पाटकर, भाग्यश्री मयेकर, अश्विनी कांदळकर, सिद्धार्थ जाधव, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, भाजप गटनेत्या अन्वेषा आचरेकर, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर यांच्यासह महेश कांदळगावकर, भाई मांजरेकर, मोहन वराडकर, किसन मांजरेकर, यशवंत गावकर, संदिप मालंडकर, आदी उपस्थित होते. तर सभागृहात नगरसेवक मंदार केणी, ललीत चव्हाण, सुदेश आचरेकर, ठाकरे गटाचे नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर आदी उपस्थित होते. उप नगराध्यक्ष पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला असून दुपारी १२.३० नंतर अधिकृत घोषणा होणार आहे.

error: Content is protected !!