कणकवली रेल्वे स्थानकातील वातानुकुलीत वेटींग रूम सेवेत रुजू….

सरकत्या जिन्याच्या कामाचाही पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते शुभारंभ

कणकवली : कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरकत्या जिन्याचे भूमिपूजन आणि प्लॅटफॉर्म नजीकच्या वातानुकूलीत वेटींग रूमचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला.

कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात आज वातानुकूलीत वेटींग रूम प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात आले. या वेटींग रूम मध्ये मोफत वायफाय, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची स्थिती दाखवणारा डिजिटल बोर्ड, स्वच्छतागृह, चार्जिंग पॉइंट अशा सुविधा रेल्वेकडून पुरवण्यात आल्या आहेत. या करिता साडेबारा लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. याच बरोबर कणकवली स्थानकातील सरकत्या जिन्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.

स्थानकातून बाहेर उतरताना प्रवाश्यांना हा जीना उपयुक्त ठरणार आहे. या जिन्यावर ६७ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. त्याची क्षमता ताशी सहा हजार प्रवासी इतकी आहे. पालकमंत्री तथा मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कोकण रेल्वेचे वाहतूक आणि वाणिज्य निदेशक सुनील गुप्ता, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट यांचे सह कोकण रेल्वेचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!