
शिवसेना मालवण तालुका चिटणीस मकरंद राणे वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष
कुणाल मांजरेकर – मालवण
मालवण तालुक्यातील असरोंडी गावच्या मातीशी आणि परिसरातील सर्वसामान्य माणसांशी घट्ट नाते जपत गेली तीन दशके सामाजिक, राजकीय आणि उद्योजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले शिवसेना मालवण तालुका चिटणीस तथा उद्योजक श्री. मकरंद राणे यांचा आज ८ ऑक्टोबर रोजी ५१ वा वाढदिवस साजरा होत आहे. पक्षनिष्ठा, संघटनात्मक बांधिलकी आणि सामाजिक जिव्हाळा या त्रिसूत्रीवर उभा राहिलेला त्यांचा आजवरचा प्रवास हीच त्यांच्या कार्याची वेगळी ओळख ठरली आहे.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्यासह राणे कुटुंबाशी असलेले नाते आणि राजकीय विचारांशी असलेली निष्ठा मकरंद राणे यांनी आपल्या कार्यातून सातत्याने जपली. राजकारणात पद हे अंतिम ध्येय न मानता संघटनेच्या वाढीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहण्याला त्यांनी महत्त्व दिले. त्यामुळेच पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक कामकाजात सक्रिय राहणारा आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणारा चेहरा म्हणून त्यांचा प्रवास पुढे आला.
आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेत काम करताना विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच स्थानिक पातळीवरील प्रश्नांशी जोडून घेण्यावर त्यांनी भर दिला. संघटनेची भूमिका गावागावात पोहोचविणे, कार्यकर्त्यांशी संवाद राखणे आणि जनतेच्या प्रश्नांच्या वेळी उपलब्ध राहणे, या माध्यमातून त्यांनी आपली राजकीय वाटचाल अधिक व्यापक केली.
असरोंडी गावचे उपसरपंच म्हणून काम करताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गावाच्या विकासाशी थेट जोडले जाण्याची संधी त्यांना मिळाली. गावातील मूलभूत प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासाच्या गरजा यांचा जवळून अनुभव घेत त्यांनी सामाजिक कामाचा पाया अधिक मजबूत केला.राजकीय क्षेत्रासोबतच उद्योजक म्हणूनही मकरंद राणे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. व्यवसायातील मेहनत, जोखीम घेण्याची तयारी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी उद्योजकीय क्षेत्रात यश मिळविले. राजकारण आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत कार्यरत असतानाही सामाजिक बांधिलकीशी असलेली नाळ त्यांनी कायम जपली आहे.
मकरंद राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे माणसं जोडण्याची हातोटी. राजकीय मतभेद असोत अथवा सामाजिक प्रश्न; वैयक्तिक नात्यांमध्ये संवाद आणि आपुलकी टिकवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला आहे. सुख-दुःखाच्या प्रसंगी मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि परिचितांच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची भूमिका त्यांच्या सामाजिक प्रवासाला वेगळी उंची देते.
असरोंडीपासून मालवणच्या राजकीय आणि सामाजिक पटावर निर्माण झालेली ही ओळख आता ५१ व्या वर्षात प्रवेश करत आहे. गेल्या तीन दशकांत मिळविलेला अनुभव, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि समाजाशी असलेले नाते यांच्या बळावर आगामी काळातही त्यांच्या वाटचालीकडून अपेक्षा निश्चितच वाढल्या आहेत.माणुसकीचा धागा, पक्षनिष्ठेची बांधिलकी, सामाजिक जाणिवेची भूमिका आणि उद्योजकीय दृष्टिकोन यांचा संगम असलेला हा प्रवास यापुढेही अधिक व्यापक व्हावा.
५१ व्या वाढदिवसानिमित्त श्री. मकरंद राणे यांना उत्तम आरोग्य, यश, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो; त्यांच्या हातून समाजहिताची आणि विकासाची अधिकाधिक कामे घडोत, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!







Subscribe to my channel






