किल्ले राजकोट येथे राजकोट मित्रमंडळाच्या वतीने बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या हस्ते आ. निलेश राणेंचा सत्कार



मालवण | कुणाल मांजरेकर
शिवजयंती निमित्ताने कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी किल्ले सिंधुदुर्ग आणि किल्ले राजकोटला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या.



आमदार निलेश राणे खास मुंबईहून दुपारच्या सत्रात किल्ले सिंधुदुर्गवर दाखल झाले. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ते नतमस्तक झाले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, नगराध्यक्षा ममता वराडकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक ललित चव्हाण, निना मुंबरकर,बाबा परब, राजू बिडये, साई म्हाडदळकर, अखिलेश शिंदे, निषय पालेकर, नारायण लुडबे, जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, सौ. सुमेधा पाताडे, मधुरा तुळसकर, सौ. प्रभाळे यांच्यासह शिवसेना व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



राजकोट किल्ल्यावर आ. राणे यांनी शिवरायांना मानवंदना दिल्यानंतर बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या हस्ते व राजकोट मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील खांदारे, ओंकार खांदारे, संतोष खांदारे, नागेश परब, अखिलेश शिंदे, विशाल मोडक, घाब्रियल नरोन्हा, भूषण परब, रणजित खांदारे, अक्षय भोसले, भावेश खांदारे यांच्यासह राजकोट मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Subscribe to my channel




