
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून श्रद्धांजली
मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील समुद्रात मासेमारीसाठी गेले असताना ‘सागरिका’ बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत भाजपाचे मालवण तालुका उपाध्यक्ष सन्मेश सुरेश परब आणि त्यांचे खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र दुःख व्यक्त करत दोघांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सन्मेश परब यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत पक्षनिष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी आपल्या कार्यातून जपली. त्यांच्या निधनाने मालवण तालुक्याने कर्तव्यदक्ष आणि समर्पित कार्यकर्ता गमावला आहे, अशी भावना चव्हाण यांनी व्यक्त केली.
“सन्मेश परब आणि अक्षय राणे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रपरिवाराच्या दुःखात भाजपा महाराष्ट्र परिवार सहभागी आहे. हे दुःख सहन करण्याचे आणि त्यातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.







Subscribe to my channel






