मालवण : मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवण यांच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कन्याशाळा, मालवण येथे तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी वाढविणे आणि शुद्ध लेखनाची सवय लागावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
ही स्पर्धा १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना खुली असून सहभागींसाठी लेखणी, कागद व मजकूर आयोजकांकडून पुरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना चषक तसेच रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. नावनोंदणीची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. नावनोंदणीसाठी लिमये हॉस्पिटल, फोन नंबर-252266 किंवा 7057906681 या क्रमांकावर संपर्क साधावा. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमाला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.