वेंगुर्ल्यात गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात ; युवा नेते विशाल परब प्रेरणादायी उपस्थिती

विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि शिक्षकांच्या योगदानाचा झाला सन्मान

वेंगुर्ला : कोकण शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि तुळस विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आलेला दहावी, बारावी व स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच मुख्याध्यापक, प्राचार्यांचा सन्मान सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमाला भाजप महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने परिश्रम घ्यावेत, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या सोहळ्यास प्राचार्य गोस्वामी सर (खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला), श्री.दयानंद कुबल (अध्यक्ष, कोकण कला व शिक्षण विकास संस्था), नगराध्यक्ष श्री. राजन गिरप, उपनगराध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर, डॉ. सचिन परुळेकर (अध्यक्ष, वेताळ प्रतिष्ठान), श्री. विवेक तीरोडकर (सचिव, वेताळ प्रतिष्ठान), श्री. समीर कुडाळकर, नगरसेवक श्री. सचिन शेट्ये, श्री. रवींद्र परब (सामाजिक कार्यकर्ते), श्री. युवराज जाधव, कु. रिया केरकर आणि कु. गौरी माईनकर रवी शिरसाट यांची विशेष उपस्थिती लाभली. याशिवाय विविध महाविद्यालयांचे उपाध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व प्राचार्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी स्वरूप लाभले असून, विद्यार्थ्यांना शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा मोलाचा संदेश मिळाला.

error: Content is protected !!