भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या मागणीची दखल ; जिल्हा कृषी अधीक्षकांच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना लेखी सूचना


मालवण : मालवण तालुक्यातील आचरा, कोळंब व मालवण महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र स्थलांतरित करणेबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, अशा लेखी सूचना सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक श्रीम. भाग्यश्री नाईकनवरे यांनी मालवण तालुका कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत.
मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे आचरा, कोळंब व मालवण या ग्रामीण मंडळातील हवामान बदल या केंद्रात नोंदले जात नसल्यामुळे सबंधित मंडळातील शेतकरी पिक विम्यापासून गेली दोन वर्षे वंचित राहत आहेत. तरी सदरील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर नेण्यात यावे. अशी मागणी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार कार्यवाही होऊन कृषी विभागाच्या माध्यमातून मालवण महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र स्थलांतरित केली जाणार आहेत. याबाबत जिल्हा कृषी विभागाने मालवण तालुका कृषी विभागास दिलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे, मालवण तालुक्यातील आचरा, कोळंब व मालवण महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्राच्या नोंदी नुकसान भरपाईस पात्र होत नसल्याने गेली दोन वर्षे सदर महसूल मंडळातील विमाधारक शेतकरी विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहेत. त्यामुळे सदरच्या तिन्ही महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र स्थलांतरीत करण्यात यावे’ हे पत्र भाजपा मालवण तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे.

Subscribe to my channel




