सावंतवाडीच्या यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे मालवण प्रवेश सुविधा केंद्र सुरू….
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह नजिकच्या परिसरात नावाजलेल्या सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी संस्थेने मालवणच्या विद्यार्थ्यांना मालवणातच संधी उपलब्ध करुन दिली आहे. मालवण व परिसरातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी (B.E.) प्रवेश प्रक्रियेची सुलभ माहिती उपलब्ध व्हावी यासाठी मालवण येथे संस्थेने प्रवेश सुविधा केंद्र सुरू केले आहे. सिताई कॉम्प्लेक्स, बस स्टँडजवळ, मालवण येथे हे केंद्र सुरु करण्यात आले आहे.
या प्रवेश सुविधा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना कॅप राउंड नोंदणी, प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती, विविध शिष्यवृत्ती योजना तसेच अभियांत्रिकीच्या विविध शाखांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, एआय अँड मशीन लर्निंग तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध आहे.
मालवण व परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी इतर ठिकाणी जावे लागू नये, त्यांचा वेळ व खर्च वाचावा तसेच स्थानिक स्तरावरच सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. या केंद्राचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२०३३६९८४ किंवा ९६०४२७२५६६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.