

मालवण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा मालवण तालुक्याचा निकाल ९८.७६ टक्के लागला आहे. यात अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थीनी साक्षी रावराणे ही ९७.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. तालुक्यातील ३५ शाळांमधून दहावीच्या परीक्षेसाठी ९७४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.७६ टक्के लागला आहे. यात २८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३५७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे. तर ३६२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, २०९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर ४२ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी प्राप्त केली आहे.
शाळानिहाय निकाल असा- टोपीवाला हायस्कूल- हर्ष पांचाळ (९७ टक्के), रोशन साळुंखे (९६.८० टक्के), आदित्य बर्डे (९६.६० टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे संचालक, पदाधिकारी, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू यांनी अभिनंदन केले आहे. रोझरी इंग्लिश स्कूल- पार्थ बागवे (९७.४० टक्के), मधुरा परब (९६ टक्के), वंशिका रावले (९५.८० टक्के), समर्थ यादव (९५.८० टक्के) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांनी अभिनंदन केले आहे. वराडकर हायस्कूल- स्वराली ताम्हणकर (९६.८० टक्के), मयुरिका मांजरेकर (९६.४० टक्के), हर्षल कानूरकर (९१.८० टक्के) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक देवयानी गावडे यांनी अभिनंदन केले आहे. शिवाजी वाचन मंदिर काळसे- गिरीजा घाडी (८९.८० टक्के), आर्या पात्रे (८९.४० टक्के), दिनेश वरक (८६.२० टक्के) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा- रुद्र जाधव (९५ टक्के), उर्वशी पारकर (९२.४० टक्के), वेदिका करवडकर (९१.६० टक्के) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. भंडारी हायस्कूल- तन्वी शिंदे (९३.२९ टक्के), वेदिका बिरमोळे (४६३), कौस्तुभ गावडे (४४५) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक एच. बी. तिवले यांनी अभिनंदन केले आहे. श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट- लतिका सावंत (९५.२० टक्के), आयेशा देसाई (९१.२० टक्के), दर्शना इंदुलकर (८७.८० टक्के) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल- भक्ती दामले (९४.८० टक्के), प्रभाकर सुर्वे (९३.६० टक्के), नैनिका कारेकर (९२.८० टक्के) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. सौ. ई. द. वर्दम हायस्कूल- रिया घाडीगावकर (८७.६० टक्के), वेदिका परब (८३.२० टक्के), लक्ष्मी नाईक (७८ टक्के) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल- त्रिशा नाईक (४५१), चैतन्य प्रभुलकर (४५०), कुणाल मिठबावकर (४२६) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. रेकोबा हायस्कूल- प्रज्ञा पवार (४१७), मानसी धुरत (३४७), पूजा परसे (३४५) या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग- वैशाली कुमठेकर (३७९), हंसिका राऊळ (३७८), फाल्गुनी देऊलकर (३७५) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.



Subscribe to my channel




