मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला हरताळ ; ‘महावितरण’ कडून ग्राहकांना धडाधड स्मार्ट मीटर बसवण्याच्या नोटीसा

४८ तासात स्मार्ट मीटर बसवणार : महावितरणच्या व्हाट्सअप मॅसेजने वीज ग्राहकांचे धाबे दणाणले

मालवण | कुणाल मांजरेकर

महावितरणच्या सेवेबाबत वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असून अनेक भागांमध्ये विज खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. तर कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने देखील ग्राहक त्रस्त झाले असून सेवेत सुधारणा करण्यापेक्षा वीज ग्राहकांचे चालू स्थितीतील वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. त्यामुळे अनेक गावातून याला विरोध होतं असून काही ठिकाणाहून संतप्त ग्रामस्थांनी वीज मीटर बदलण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावल्याचे प्रकार देखील घडले आहेत. त्यामुळे महावितरणने आता वीज ग्राहकांना मोबाईल वर व्हाट्सअप मॅसेज पाठवून ४८ तासात स्मार्ट मीटर बदलून देणार असल्याची नोटीसच पाठवली आहे. अनेक वीज ग्राहकांना अशा नोटीसा प्राप्त झाल्या असून यामुळे वीज ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नागपूर अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला असता घरगुती वीज ग्राहकांचे वीज मीटर जबरदस्तीने बदलण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनाला महावितरणने हरताळ फासल्याचे स्पष्ट झाले आहे.

महावितरणकडून सध्या ग्राहकांना मेसेज पाठवले जात आहेत. त्यात स्मार्ट मिटर बदलले जाणार असं सांगितलं जात आहे. या मेसेजमध्ये जर तुमचा मीटर ‘स्मार्ट मीटर’ नसेल, तर हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर MSEDCL (महावितरण) किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी ‘स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही शुल्क महावितरणने आकारले नाही. पण, पुढे काही दर आकारले जाणार आहे का, याबद्दल कोणतीही माहिती महावितरणने दिली नाही.

व्हॉट्सअपवर काय आहे मेसेज?

error: Content is protected !!