आ.निलेश राणेंच्या उपस्थितीत उबाठाला मालवणात मोठा धक्का ; महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण शिवसेनेत

माजी नगरसेविका नीना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, प्रसाद आडवणकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उबाठाला सोडचिठ्ठी

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी उबाठा गटाला मालवणात मोठा धक्का दिला आहे. उबाठा गटाच्या महिला तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने उबाठाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश कर्त्यांमध्ये माजी नगरसेविका नीना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, प्रसाद आडवणकर, शाखाप्रमुख मोहन मराळ, दिगंबर बगाड, माजी पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

आमदार निलेश राणे यांनी या सर्वांचे शिवसेनेच्या कुटुंबात स्वागत केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख दीपक पाटकर, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, उमेश नेरूरकर, बाळू तारी, सहदेव बापर्डेकर, राजन परुळेकर, किसन मांजरेकर, प्रीतम गावडे, मधुरा तुळसकर, अंजना सामंत, जॉन नरोन्हा, बाळू नाटेकर, राजेश गावकर, श्याम वाक्कर, अरुण तोडणकर, संदीप भोजने, राजू बिडये, मंदार लुडबे, शेखर गाड यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ऋत्विक चव्हाण, वेदांत चव्हाण, नागेश चव्हाण, उप शाखाप्रमुख दिलावर शेख, साहित जाधव, संदेश डिकवलकर, महेश कोळंबकर, ग्रीश जाधव, रमेश कासले, अमोल चाफेखोलकर, राहुल मोरे, सीमा कोळंबकर, माधुरी जाधव, शाली पेंडुरकर, नूतन मालवणकर,यश चव्हाण, श्रीकृष्ण चव्हाण, आनंद मालवणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

error: Content is protected !!