बांदिवडेत उबाठाला धक्का : आ. निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण कुडाळच्या सर्वांगीण विकासाठी कटीबद्ध : आमदार निलेश राणे यांची ग्वाही

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोट्यावधीचा विकासनिधी : दत्ता सामंत यांची माहिती

मालवण : शिवसेनेने बांदिवडे गावात उबाठाला जोरदार धक्का दिला आहे. बांदिवडे गावचे उपसरपंच पुष्पक घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण परब, विनायक गावकर, अनंत हडकर, सौं. आर्या हडकर यांसह अनेक ग्रामस्थ यांनी आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदिवडे येथील निसर्गप्रभा रिसॉर्ट येथे पक्षप्रवेश संपन्न झाला.

यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले, कुडाळ-मालवण मतदार संघाची ओळख 2014 पासून हरवलेली होती. ती ओळख परत मिळवण्याचा प्रयत्न अधिकाधिक विकासनिधीच्या माध्यमातून पुर्ण केला जात आहे. जनतेला अपेक्षित विकासकामे पुर्ण करत गावा-गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहोत. विकासकामे होत असताना ज्या विश्वासाने लोकं शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत, त्या सर्व प्रवेशकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवत त्यानी मागणी केलेली जनतेची सर्व विकासकामे 100 टक्के पुर्ण करणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश राणे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, विभाग प्रमुख संतोष कोदे, जिल्हापरिषद सदस्या वर्षा सांबारी, पं. स. सदस्य गणेश तोंडवळकर, माजी सरपंच तथा खरेदी विक्री संघ संचालक प्रफुल्ल प्रभू, सरपंच आशु मयेकर, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, मालवण उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, जयप्रकाश परुळेकर, शाखा प्रमुख बाळू माळकर, निवेदक आनंद परब यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आमदार निलेश राणे पुढे म्हणाले, खऱ्या शिवसेनेत सर्वांचे स्वागत आहे. गावातील मागणी केलेली रस्ते, खार बंधारे व अन्य विकास कामे पुर्ण केली जाणार असून खणीकर्म योजनेतूनही निधी प्राप्त करून रस्ते विकासकामे केली जाणार. महायुती सरकार विकासासाठी कटीबद्ध आहे. राणेसाहेब खासदार आहेत, नितेश राणे पालकमंत्री आहेत, मी आमदार आहे. आम्ही जनतेच्या सेवेसाठी आणि विकासासाठी कटीबद्ध असून जनतेला अपेक्षित सर्व विकासकामे पुर्ण केली जाणार आहेत.

शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकामात मोठे सहकार्य आहे. माझ्या पहिल्या बजेट अधिवेशन मध्ये 158 कोटी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजूर केले. मोठा विकासनिधी येत असून महायुती सरकार म्हणून आम्ही जनतेच्या सेवेसाठी कुठेही कमी पडणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करणार, असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.सर्वात जास्त दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत प्रवेश घेण्यात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत अग्रेसर आहेत. धनुष्यबाण सगळीकडे पोहचला पाहिजे. पक्षप्रवेश होत असताना गावागावात शिवसेना जोमाने वाढवूया. शिवसेना वाढवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

आमदार निलेश राणे यांच्या माध्यनातून कोट्यावधी विकासनिधी : दत्ता सामंत

आमदार निलेश राणे जनतेचा आवाज बनून अधिवेशन गाजवत आहेत. गेल्या काही महिन्यात 50 कोटी पेक्षा जास्त निधी मालवण तालुक्यासाठी आमदार निलेश राणे यांनी आणला. आणखी निधी येत आहे. यापूर्वीही आणला आहे. तोंडवळी व अन्य किनारी ठिकाणी बंधारा विकासासाठी मोठया प्रमाणात विकासनिधी आमदार निलेश राणे आणत आहेत. याचं विकासकार्यावर प्रेरित होऊन अनेक पक्षप्रवेश होत आहेत. बांदिवडे गावही आता पूर्णपणे भगवामय झाला. सर्वाना सॊबत घेऊन गावा गावांचा सर्वांगीण विकास हेच लक्ष आहे. ग्रामस्थांची मागणी असलेली रस्ते, खार बंधारा व सर्व विकासकामे पुर्ण केली जातील. असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.

बांदिवडे गावातील प्रवेशकर्ते

बांदिवडे उपसरपंच पुष्पक घाडीगावकर, बांदिवडे ग्रामपंचायत सदस्य नारायण परब, विनायक गावकर, अनंत हडकर, सौ आर्या हडकर ग्रामस्थ महेश हडकर, लविशा मुणगेकर, वैष्णवी मेस्त्री, पल्लवी मुणगेकर, वैष्णवी मुरकर, मामा घागरे, सत्यवती मुरकर, रसिका हडकर, वर्षा हडकर, सदानंद हडकर, कमेश गावकर, यशवंत परब, योगिता परब, सिद्धेश सावंत, महेंद्र हिरलेकर, तन्मय आहीर,योगेश मेस्त्री, सुजय मेस्त्री, उपस्थित प्रमुख मान्यवर प्रफुल्ल प्रभू ,आनंद परब, रामचंद्र माळकर, उदय सावंत, सतीश आहीर, उमेश परब, विलास परब, प्रमोद परब, पुतळा आहीर,संदीप आहीर,लीलाधर मुणगेकर, मंगेश राणे, अजय घाडीगावकर, विकास घाडी, प्रकाश घाडीगावकर, दिनेश परब, वामन परब, किरण पवार, विकास आचरेकर, हर्षता प्रभू, उमेश परब, हार्दिक परब, अविनाश प्रभू, प्रवीण प्रभू, अंजली घाडीगावकर, अनुष्का परब, संगीता परब, वेदिका परब, प्राची परब, संदेश पवार, प्रकाश मेस्त्री, तृप्ती प्रभू, आप्पा परब, रमेश मेस्त्री, केशव मेस्त्री, गोविंद घागरे, आशा घागरे, सुजाता परब, करण मेस्त्री, नितीन घागरे, दिनेश मंचेकर, विजय हडकर, सुभाष मुनगेकर यांसह अनेक ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

error: Content is protected !!