१९९० सालापासून शिरवंडे गाव हा राणेसाहेबांसोबत एकनिष्ठ : शिरवंडे शिवसेना शाखाप्रमुख संजय बाळकृष्ण घाडीगांवकर यांची प्रतिक्रिया


रघु गांवकरला बोलते करणाऱ्या तालुक्यातील पडद्यामागच्या बोलावत्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नसल्याचा टोला
मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या निवासस्थानी सोमवारी एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या शिरवंडे येथील रघु गांवकर यांनी सदिच्छा भेट घेतली. एका धार्मिक विषयात ही भेट होती. सामाजिक विषयातील ही भेट असल्याने त्या भेटीची छायाचित्र सोशल मीडियात प्रसारित झाली. ही भेट सामाजिक धार्मिक विषयावर आल्याने प्रसारित झालेल्या फोटोवर आक्षेप घेण्यासारखे काहीच नव्हते. मात्र रघु गांवकर याला समोर करून तालुक्यातील काही मंडळीना राजकारण करायचे होते. त्यासाठी रघु गांवकर याला पुढे करून खुलासे व निष्ठेच्या गोष्टी वदवून स्वतःचे मोठेपणा काहींना दाखवायचे होते. मात्र अश्या व्यक्तींचे मनसुबे कधीच सफल होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया शिरवंडे शिवसेना शाखाप्रमुख संजय बाळकृष्ण घाडीगांवकर यांनी दिली आहे. रघु गावकर हे मूळ उबाठा शिवसेनेचे. असे असतानाही १९९० सालापासून शिरवंडे गाव हा राणेसाहेबांसोबत एकनिष्ठ आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये शिरवंडे गावामध्ये राणेसाहेब यांना मताधिक्य असल्याची आठवण त्यांनी करून दिली.
रघु गांवकर हे मूळ उबाठा सेनेचे. मात्र गेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आम्हाला शिरवंडे गावातील ग्रामस्थांचा रघु गांवकरला पक्षात घेण्यात विरोध होता. कारण त्याचा आम्हाला शिरवंडे गावामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. रघु गांवकर नसतेवेळी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिरवंडे गावातून ६ वेळा ग्रामपंचायतीची बॉडी विरोधकांना एकही सदस्य न देता निवडून आलेली आहे. त्यामुळे रघु गांवकर यांचा फायदा शून्य होता. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकी मध्ये रघु गांवकर यांनी राणेसाहेबांच्या विरोधात विरोधी पक्षाचे काम केलेले आहे असेही काहींनी आम्हाला सांगितले. अशी पार्श्वभूमी असताना रघु गांवकर निष्ठेचा खोटा दिखावा करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची रघु गांवकर व वाडीतील लोकांनी विठ्ठल रखुमाईचं नवीन मंदिर बांधकामाच्या संदर्भात मदतीसाठीच भेट घेतली होती. धार्मिक काम लक्षात घेता दत्ता सामंत यांनी त्या मंदिरासाठी असणारा सभागृह स्वःखर्चाने बाधून देतो असे सांगितले. अंदाजे त्या हॉलसाठी ४ ते ५ लाख रुपये खर्च आहे. दत्ता सामंत यांनी सुमारे ४ लाखाचे साहित्य त्या मंदिरासाठी पोच केले. हे दत्ता सामंत यांचे दातृत्व आहे. सामाजिक कार्यात मदत करणे ही राणेसाहेबांची आम्हा सर्वाना असलेली शिकवण आहे. त्याच भावानेतून दत्ता सामंत आमदार निलेश राणे यांच्या सोबतीने जनसेवा करत आहेत. मंदिरासाठी दिलेली मदत ही धार्मिक भावनेतून आहे. या मंदिरासाठी आणखीही काही मदत लागल्यास मी ग्रामस्थ यांच्या सोबत आहे, ही भावना दत्ता सामंत यांची आहे. धार्मिक, आरोग्य विषयक मदत या विषयात दत्ता सामंत यांनी राजकारण कधी आणले नाही. असे असताना रघु गांवकर व त्यांना बोलते करणाऱ्या तालुक्यातील पडद्यामागच्या काहीनी राजकारण करून आपला डाव साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यापुढे तसें झाल्यास रघु गांवकर यांना जशास तस उत्तर दिले जाईल. राणेसाहेबांशी शिरवंडे गाव हा एकनिष्ठ राहिला आहे आणि पुढेही राहणार आहे. रघु गांवकर ज्या पक्षामध्ये काम करत आहेत, त्यासाठी त्यांना शुभेच्या आहेत. अशी भुमिका शिरवंडे शिवसेना शाखाप्रमुख संजय बाळकृष्ण घाडीगांवकर यांनी स्पष्ट करत आपण निष्ठावंत राणे समर्थक असल्याचेही म्हटले आहे.

Subscribe to my channel




