Malvan | भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोतांचा झंझावाती प्रचार सुरूच ; जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या मार्गी लागणार

मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक रिंगणातील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांनी झंझावती प्रचाराला सुरुवात केली आहे. आज दांडी येथील दांडेश्वर मंदिरात श्रीफळ ठेऊन त्यांनी दांडी किनारपट्टी पिंजून काढली. घरोघर प्रचारावर भर देत भाजपा सरकारकडून करण्यात येणाऱ्या विकासकामे, योजना, लोकांपर्यंत पोहोचवत असून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सौ. खोत यांनी सांगितले.

दांडी येथील दांडेश्वराला भाजपा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होऊदे असे साकडे घालण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक ९ ब च्या उमेदवार अन्वेषा आचरेकर, नगरसेवक पदाचे उमेदवार सन्मेष परब, यतीन खोत, मंदार केणी, दाजी सावजी, तोडणकर, अजित आचरेकर यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक उपास्थित होते.

यावेळी शिल्पा खोत म्हणाल्या, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. दांडी किनारपट्टीवर पर्यटन व्यावसायिकांच्या अनेक समस्या ते मार्गी लावणार आहेत. दांडी किनाऱ्यावर अनेक योजना आणून येथील विकास करण्यात येत आहे. दांडी किनारपट्टीचा विकास व्हावा याचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. येथे बंधारा कम रस्ता करण्यात येणार आहे. याचा फायदा मच्छिमारांसह पर्यटन व्यवसायिकांना होणार आहे. स्थानिक महिलांना इथे रोजगार मिळावा यासाठी त्यांनी खाऊगल्लीची संकल्पना मांडली आहे. त्यामुळे येथील महिलांना इथेच रोजगार मिळणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दांडीसह शहराचा विकास करण्यात येणार असल्याचे शिल्पा खोत यांनी सांगितले.

error: Content is protected !!