
स्वामींचे सेवाव्रत निष्ठेने पुढे नेणारे महेश इंगळे यांना भेटून आनंद झाला : न्या. भुषण गवई

वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनानंतर चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते स्वामी कृपावस्त्र देऊन सत्कार
अक्कलकोट : सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भुषण गवई यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे व वटवृक्षाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी न्या. भुषण गवई व त्यांच्या समवेत असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार व सेवानिवृत्त माजी न्यायमूर्ती विनय जोशी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व स्वामींची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.

श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नसून करोडो भक्तांचा श्वास आहेत. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हा त्यांचा अभयमंत्र आजही संकटकाळी भक्तांना धीर देतो. वटवृक्षाच्या रूपाने स्वामी आजही येथे वास करतात याची प्रचिती येथे आल्यावर येते. अशा या महान स्वामींच्या मंदीरात सेवा करण्याची संधी इंगळे कुटूंबियांच्या माध्यमातून परंपरेप्रमाणे चेअरमन महेश इंगळे यांना लाभली आहे. त्यामुळे देवस्थान समितीच्या माध्यमातून स्वामींचा सेवाव्रत निष्ठेने पुढे नेणारे महेश इंगळे यांना भेटून आनंद झाला असल्याचे मनोगत सेवानिवृत्त सरन्यायाधीश भुषण गवई यांनी व्यक्त केले.

दर्शनानंतर सरन्यायाधीश भुषण गवई यांनी मंदिर परिसराची पाहणी करून देवस्थान संचलीत भक्त निवास, तंत्रनिकेतन महाविद्यालय, तसेच रुग्णालय येथील देवस्थानचे व्यवस्थापन व्यवस्थेचे कौतुक केले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, अक्कलकोट न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश एम.एम. कल्याणकर, श्रीमती एन.एल.ए. शेख, दिवाणी न्यायाधीश क.स्तर अक्कलकोट तसेच न्यायालयातील कर्मचारी वाय.डी. पैठणकर, के.ए. रणदिवे, सोमशेखर बाहेरमठ, अविनाश सुरवसे, सुनील कोनापुरे, अक्कलकोट बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील, उमाप साहेब, मंदिर समितीचे पदाधिकारी, सेवेकरी व स्वामीभक्त उपस्थित होते.





Subscribe to my channel






