आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर ; शिवसेना विभागप्रमुख मंदार लुडबे यांनी खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मानले आभार
मालवण : मालवण तालुक्यातील सागरी अतिक्रमण ग्रस्त देवबाग गावाला वाचवण्यासाठी शिवसेनेचे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. आ. राणे यांच्या पाठपुराव्याने तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रयत्नातुन देवबाग समुद्र किनारी पंढरीनाथ मंदिर ते विंडमिल हॉटेल पर्यंत १००० मीटर बंधारा कम रस्त्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे कार्यारंभ आदेश आर. बी चव्हाण यांच्या नावे प्राप्त झालेले आहे. त्याबद्दल शिवसेनेचे विभागप्रमुख मंदार लुडबे यांनी खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत. या कामाच्या मंजुरीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांनी देखील प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे.