मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व मनसे सरचिटणीस संदीप दळवी, संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत व जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मालवण तालुक्यातील हेदुळ गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन आणि शहराध्यक्ष सागर जाधव यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
यावेळी हेदुळ गावातील विभाग अध्यक्ष संतोष सावंत, शाखा अध्यक्ष सूरज पुजारे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांनी मनसेची मानाची शाल घालून पक्षात स्वागत केले. तसेच उपस्थिताना गणेश वाईरकर आणि सागर जाधव यांनी मार्गदर्शन केले आणि वेळोवेळी पक्ष आपल्या पाठीशी ठाम उभा राहील याची ग्वाही दिली.
प्रवेशकर्त्यांमध्ये दिपाली दिवाकर पुजारे, प्रीतेश सावंत, दर्शन सावंत, शुभम पुजारे, धाकू राऊळ, भिकाजी परब, रूपेश गावडे, पीयूष पुजारे आदी असंख्य कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. यापुढेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेशांचा धडाका सुरू राहील असे श्री गणेश वाईरकर यांनी स्पष्ट केले. तसेच आमच्याकडे प्रवेश करणारे हे राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करण्यास इच्छुक आहेत. आर्थिक प्रलोभने दाखवून आम्ही प्रवेश घेत नाही असे श्री गॅरी अन्ननसिएशन यांनी सांगितले.