
शेवटपर्यंत दशावतार कलावंतांसोबत राहणार : आ. निलेश राणे यांची ग्वाही ; खरे कलाकार वंचित राहू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या आग्रही मागणी आणि पाठपुराव्यामुळे कोकणची पारंपरिक लोककला असलेल्या दशावतारी कलाकारांना न्याय मिळाला असून यानिमित्ताने मंगळवारी जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा मालवणात हृदय सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कोकणची पारंपरिक दशावतार लोककला जपणायचे आणि समृद्ध ठेवण्याचे कार्य माझा दशावतार कलावंत करत असताना अनेक वर्ष न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत होता. हा संघर्ष मी प्रत्यक्ष बघितला आहे. शासन दरबारी दशावतार कलावंतांना न्याय मिळवून देत असताना शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहणार असल्याचा विश्वास आ. राणे यांनी व्यक्त केला.
मी विधिमंडळात दशवतार कलाकार यांचा आवाज बनलो. मात्र यासाठी सातत्याने दत्ता सामंत यांचा पाठपुरावा महत्वाचा राहिला. महायुती सरकारच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी या कलावंतांना शासन दरबारी न्याय देण्याची घोषणा केली. लवकरच याबाबत शासन निर्णय होईल. दशावतार कलावंत हे कुटुंब असून मी सोबतच राहणार. असेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली.आमदार निलेश राणे यांची झालेली ही भेट ही कृतज्ञता सोहळा ठरली. विधानसभेत दशावतार कलाकारांच्या मागण्यांचा आवाज ठामपणे उठवत आम्हाला आमदार निलेश राणे यांनी शासन दरबारी न्याय मिळवून दिला. असे सांगत पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर यांच्या हस्ते आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नेहमी दशावतार कलाकारांच्या हाकेला साथ देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचाही यात मोलाचा वाटा आहे. असे सांगत त्यांचाही सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच कोकणात दशावतार कलावंत यांचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करून ऋण व्यक्त केले जाणार आहेत. असेही दशावतार कलावंत यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांसह अन्य पदाधिकारी व दशावतार कलावंत मोठया संख्येने उपस्थित होते.






Subscribe to my channel






