भाजपच्या मसुरे व देवबाग पं. स. मतदार संघाच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार ; आगामी निवडणुका ताकदीने जिंकण्यासाठी नियोजन


मालवण :भारतीय जनता पार्टीची मसुरे व देवबाग पं. स. विभागाची आढावा बैठक कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका भाजप म्हणून ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात आला. आज केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपचीच गरज असल्याचे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. भाजपच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विचार खऱ्या अर्थाने रुजवला जाण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सेवा सुशासन पंधरवडा व आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या विषयावर कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यासाठी आयोजित भारतीय जनता पक्षाच्या या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या आगामी दौऱ्याचे नियोजन तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदनपर ठराव संमत करण्यात आला. बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, मंदार केणी, राजू परुळेकर, राजन गावकर, अन्वेशा आचरेकर, महिमा मयेकर, दीक्षा गावकर, दिव्या कोचरेकर यांच्यासह भाजपचे तालुका उपाध्यक्ष केदार झाड, मिलिंद झाड, मुन्ना झाड, श्यामा झाड, जयवंत सावंत, संदीप बोडवे, तारकली सरपंच मयेकर, देवानंद लोकेगावकर, बाळू मेस्त्री, केळुसकर, रामा चोपडेकर, मसुरे येथील बंडू गावडे. यासिन सय्यद, डॉ. मेहेंदळे, तातू भोगले, उद्योजक दिपक परब, रोहेश गावकर, जगदीश चव्हाण, निलेश खोत तसेच मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
















Subscribe to my channel




