बांगीवाडा येथील रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य ; नागरिकांचे हाल

नगरपालिकेने तात्काळ पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात : मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची मागणी

मालवण : शहरातील बांगीवाडा येथील समर्थ वैभव कॉम्प्लेक्स समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून यामुळे वाहनधारक व येथील स्थानिक व्यवसायिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केली आहे.

या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य असून या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. येथे किरकोळ प्रमाणात अपघात देखील घडले आहेत. नगराध्यक्षानी अलीकडे वृत्तपत्रांना माहिती देताना गणपती पूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करणार असल्याचे म्हटले आहे. पण गणपती सणासाठी अजून एक महिना बाकी असून शहरवासीय आणि येथील स्थानिक व्यावसायिक यांची गैरसोय विचारात घेऊन याठिकाणी तात्काळ उपाययोजना करावी, असे श्री. अन्ननसिएशन यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!