मालवण पत्रकार समिती आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे ९० हून अधिक रुग्णांची यावेळी तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी डॉ. गौरव घुर्ये, डॉ. दत्तात्रय ठाकूर, डॉ. सुधीर मेहेंदळे, मालवण पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे, विद्याधर केनवडेकर, नंदकिशोर महाजन, प्रफुल्ल देसाई, मनोज चव्हाण, कुणाल मांजरेकर, कृष्णा ढोलम, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर, संग्राम कासले, आप्पा मालंडकर, भूषण मेथर, सिद्धेश आचरेकर, सौगंधराज बादेकर, गणेश गावकर, राहुल कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शिबिरात डॉ. गौरव घुर्ये यांनी किडनी विकार, श्वसन विकार, मधुमेह या आजाराच्या रुग्णांची तपासणी केली तर डॉ. दत्तात्रय ठाकूर यांनी हाडांचे विविध आजारांवर, मणक्यांचे, संधीवात या आजाराच्या रुग्णांची तपासणी केली. या शिबिरास ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले. डॉ. घुर्ये हे प्रत्येक शनिवारी तर डॉ. ठाकूर हे प्रत्येक मंगळवारी सुमतीछाया मेडिकल नजीक सेवा देणार आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!