
मालवण : श्रावण महिन्याचे औचित्य साधून पाट येथे उद्या गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी ‘श्रावण भजन महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. आई सातेरी मित्र मंडळ, पाट यांच्या आयोजन व विशेष सहकार्याने हा भजन महोत्सव आई सातेरी देवी मंदिर, पाट येथे भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.
या महोत्सवात विविध नामवंत भजन मंडळांकडून सुश्राव्य भजनसेवा सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता बुवा श्री. सुरेश तेली व तुळशिदास गावडे आणि सहकाऱ्यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते निलेश खोरजुवेकर व अनिकेत तुळसकर आहेत. त्यानंतर रात्री ८ वाजता मूळ पुरुष प्रासादिक भजन मंडळ, तुळस-वडखोल यांची भजनसेवा होणार असून, या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते विनेश खोरजुवेकर व निखिल मोरेकर आहेत. रात्री ९ वाजता श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ, वडखोल यांचे सुश्राव्य भजन सादर होणार आहे. या भजनाचे नेतृत्व बुवा श्री. रुपेंद्र परब करणार असून, कार्यक्रमाचे पुरस्कर्ते लवू तोंडवळकर, गणेश खोरजुवेकर व तेजस गावकर आहेत.
श्रावणातील भक्तिमय वातावरणात रंगणाऱ्या या भजन महोत्सवाच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक व सांस्कृतिक मेजवानी अनुभवता येणार आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आई सातेरी मित्र मंडळ, पाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.







Subscribe to my channel






