सर्व धर्म समभावाचे प्रतिक श्री गणेश येशू मंदिराचा उद्यापासून वर्धापन दिन सोहळा

१४ ते १६ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम

मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण शहरातील गवंडीवाडा येथील श्री गणेश येशू मंदिराचा १९ वा वर्धापन दिन १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त दि. १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्त १४ ऑक्टोबर रोजी लघुरुद्र, दि.१५ रोजी सकाळी ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वा. संगीत भजन, रात्री ८ वा. येशू पूजा (तेस), दि. १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वा. काकड आरती, दुपारी १ वाजता ब्राह्मण भोजन आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश येशू मंदिर मित्रमंडळाचे अध्यक्ष आतू फर्नांडिस, कार्याध्यक्ष दीपक कदम, उपाध्यक्ष बबन वाघ व मित्रमंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!