रोख रक्कम असलेली गाडी पोलिसांच्या नाका बंदीच्या जाळ्यात ; प्रकरण मिटवण्यासाठी भाजपचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात
आमदार निलेश राणे आक्रमक ; कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात दाखल
मालवण : मालवण नगर पालिकेचा प्रचार संपल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड येथील भाजप पदाधिकाऱ्याची MH-07- AS-6960 ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नाकाबंदी वेळी पोलीसाना या गाडीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम अडाळून आली.
मालवण पोलीसानी सदर वाहन अधिक तपासासाठी मालवण पोलीस ठाणे इथे आणले असता मालवण येथील भारतीय जनता पार्टीचे दोन पदाधिकारी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यात येऊन सदर प्रकरण मिटवण्यासाठी हस्तक्षेप करत असल्याचे समजताच आमदार निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले.त्यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण तंग झाले जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातुन मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा आमदार निलेश राणे यांनी घेतला
.यावेळी भाजपचे पदाधिकाऱ्यांनी गाडीतील रोख रक्कम बाजूला ठेवा वा आम्हाला मोकळे करा असे संभाषण केले असून त्याचे व्हिडिओ देखील हताशी मिळाल्याचे समजते. या घटनेमुळे मालवण पोलीस ठाण्याच्या आवारात वातावरण तंग बनले आहे.