क्रिकेट सामने सुरु असताना प्रेक्षक गॅलरी कोसळली

मालवणातील दुर्घटना ; जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार

मालवण | कुणाल मांजरेकर

शहरातील बसस्थानका पाठीमागील भागात सुरु असलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे सामने सुरु असताना अचानक प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने काहीजण जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी १३ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत चार ते पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. तर एकाला अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलवण्यात आले. दुर्घटनेनंतर काही वेळाने उर्वरित सामने स्थगित करण्यात आले. प्रेक्षक गॅलरीत गर्दी झाल्याने ती कोसळल्याची घटना घडली.

मालवण बसस्थानका पाठीमागील परिसरात मागील चार दिवसांपासून डे नाईट पिंट्या स्मृती चषक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. काल स्पर्धेचा अंतिम दिवस होता. मध्यरात्री याठिकाणी सामने सुरु असताना प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती. प्रेक्षकांसाठी ग्राउंडच्या दुर्तफा स्टॅण्ड उभारण्यात आले होते. यातील एक स्टॅण्ड अचानक कोसळल्याने त्यावरील सर्वजण कोसळले. यातील चार ते पाच जणांना रुग्णालयात नेण्यात आले. यातील एकाला पुढील उपचारासाठी कुडाळ येथे नेण्यात आले. दुर्घटनेनंतर आयोजकांनी जखमीना उपचारासाठी दाखल करण्यासाठी मोठी धावपळ केली. त्यामुळेच एवढा मोठा अपघात होऊनही कुणाला मोठी दुखापत झाली नाही. अपघातानंतर उर्वरित सामने थांबवण्यात आले.

error: Content is protected !!