आभाळमाया ग्रुपतर्फे ९ नोव्हेंबरला ‘सुंदर श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२६’ पर्व २ चे आयोजन
मालवण : भगवान श्रीकृष्णांच्या मनमोहक रूपाचा, बाललीलांचा आणि भक्तिमय संस्कृतीचा जागर करण्यासाठी आभाळमाया ग्रुप कट्टा यांच्या वतीने ‘कट्टा पंचक्रोशी मर्यादित सुंदर श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२६ – पर्व २’ या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील पर्वाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा दुसऱ्या पर्वाचे आयोजन अधिक उत्साहात करण्यात येत आहे. सोमवार दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता कट्टा बाजारपेठेतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर येथे ही स्पर्धा रंगणार आहे.
या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा पूर्णपणे विनाशुल्क असून सर्व वयोगटांसाठी खुली आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत महिला आणि पुरुष अशा सर्वांना श्रीकृष्णाचे रूप धारण करून आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे. आकर्षक वेशभूषा, मनमोहक सादरीकरण आणि कृष्णभक्तीचा संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे.
स्पर्धकांना आकर्षक वेशभूषेतून आपल्या आवडत्या श्रीकृष्णाचे रूप साकारता येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसांसह रोख पारितोषिके, तर सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे, यासाठी आभाळमाया ग्रुपच्या सदस्यांसह मित्रमंडळी आणि हितचिंतकांनी आपल्या मुलांना तसेच शेजारील आणि वाडीतील मुलांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपली नावे व मोबाईल क्रमांक कट्टा ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या कोकणरत्न चहा शॉप येथे किंवा राकेश डगरे – ९९८७७६२८९६, तुषार सकपाळ ९४२१०४१०९३, तेजस म्हाडगुत ८०८०९२७५६७, गणेश गाड – ९१४६१२००२०, अक्षय गावडे – ८३०८८६१६२६ यांच्याकडे नोंदवावीत. कट्टा पंचक्रोशीतील नागरिकांनी या कृष्णमय सांस्कृतिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आभाळमाया ग्रुप कट्टा यांच्या वतीने करण्यात आले आहे.




Subscribe to my channel




