भाजपची आडवली जि. प. मतदार संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार

मालवण: तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या आडवली जिल्हा परिषद मतदार संघाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला. 

या बैठकीत महिला कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पाठवलेल्या राख्या भाजपचे तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी, मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीला कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

यावेळी तालुकाप्रमुख धोंडी चिंदरकर, गजू बाकरे, मंदार केणी, राजू परुळेकर, महेंद्र चव्हाण, प्रवीण घाडीगावकर, नितीन पवार, राजेश तांबे, श्री. बापट यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!