रेवतळेत आधारकार्ड लिंक शिबिराला “शंभर नंबरी” प्रतिसाद

युवासेना शाखाप्रमुख सिद्धेश मांजरेकर यांचा उपक्रम

मालवण : युवासेना मालवणच्या वतीने युवासेना शाखाप्रमुख सिद्धेश मांजरेकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आधार कार्ड लिंक शिबिराला शंभर नंबरी प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. रेवतळे येथे उमेश मांजरेकर यांच्या निवासस्थानी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेविका शीला गिरकर, पॉली गिरकर, उमेश मांजरेकर, युवासेना तालुकाप्रमुख मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, तुषार हडकर, सागर नरे, धनंजय मिठबावकर, अस्मित चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरिक आणि युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!