विभागप्रमुख समीर लब्दे यांची माहिती ; विविध कार्यक्रमांचे आयोजन
मालवण : माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बुधवारी २५ मार्च रोजी आचरा विभागात चिंदर मध्ये त्यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेनेचे आचरा विभागप्रमुख समीर लब्दे यांनी दिली आहे.
यात प्रामुख्याने सकाळी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप होणार असून त्यानंतर संध्या. ८ वा. आचरा विभागातील जेष्ठ नागरीकांचा सत्कार सोहळा, चिंदर गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि बारापाच मानकऱ्यांचा सत्कार समारंभ, रात्री ८.३० वा. माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस समारंभ तर रात्रौ ९ वा. कलेश्वर दशावतारनाट्यमंडळ नेरूर यांचा सातेरी मंदिर नजीक, चिंदर येथे दशावतारी नाट्यप्रयोग (पुरस्कृत – पप्पू परुळेकर, ग्रा.प. सदस्य चिंदर) होणार आहे, तरी नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समीर लब्दे यांनी केले आहे.