
जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी : भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त मळेवाड येथे आयोजित पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. वाढदिवसाचा आनंद समाजसेवेच्या माध्यमातून साजरा करण्याच्या संकल्पनेतून आयोजित या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मळेवाड येथून झाला.
विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा मिळण्यास मदत होत आहे. या महाआरोग्य शिबिरासाठी रुबी हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, अथायु हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले.
यावेळी मंडळ अध्यक्ष मधु देसाई, उपसभापती गौरव मुळीक, हेमा मराठे, पंचायत समिती सदस्या धनश्री मराठे, पंचायत समिती सदस्य अंकित धाऊस्कर, अण्णा झाट्ये, दादा परब, सिद्धेश नाईक, किरण पालयेकर, नारायण कांबळी, सिद्धेश कांबळी, किसान मोर्चा अध्यक्ष केशव नाईक आणि ओंकार आजगावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या आरोग्यसेवा उपक्रमातून ‘सेवेचा संकल्प, आरोग्याचा ध्यास!’ हा संदेश देण्यात आला. समाजसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.







Subscribe to my channel






