ठाकरे शिवसेनेने सा. बां. विभागाचे लक्ष वेधले ; आंदोलनाचा इशारा


मालवण : मालवण शहरातील कचेरी ते मालवण ते देउळवाडा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीत येतो. या संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली असून हरीहरेश्वर मंदीर ते लिमये हॉस्पीटल रस्ता खडी व धूळ वर आल्याने मृत्युचा सापळा बनला आहे. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी सदरील रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा. याची कार्यवाही न झाल्यास याच खड्डेमय रस्त्यावर तीव्र आंदोलन उभारले जाईल, यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम राहील,असा इशारा ठाकरे शिवसेनेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कार्यालयाच्या कार्यकक्षेत कचेरी ते मालवण ते देउळवाडा हा रस्ता येत आहे. शांतता बैठकीत ठरल्याप्रमाणे गणेशचतुर्थी पूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुझवणे आवश्यक असल्याने आपल्या कार्यालयामार्फत घाईगडबडीत निकृष्टपणे सिमेंटने खडे बुझवले गेले. त्याबाबत ठाकरे शिवसेनेच्या शहर प्रमुख व पक्षाच्या कार्यकत्यानी आक्षेप घेतला होता. आजमितीस त्या रस्त्याच्या खड्यातील सिमेंट जावून फक्त धुळ व खडी शिल्लक राहीली आहे. भरड ते फोवकांडा पिपळ हा रस्ता शाळा, कॉलेज व बाजार असल्याने रहदारीचा रस्ता आहे. हरेहरेश्वर मंदीर ते लिमये हॉस्पीटल हा रस्ता तर खडी व धुळ वर आल्याने मुत्युचा सापळा बनला आहे. खड्डे तर आहेतच पण रस्त्यावरील खडी वरून घसरून बरेच जण पडलेले आहेत. सदरील रस्त्यावरून चालताना विद्यार्थी, नागरिक तसेच दुचाकीस्वार यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यामुळे सदरील रस्त्यावरील खड्डे भरणे आवश्यक असून तातडीने हा रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे. कोणतीही जीवित हानी होण्यापूर्वी सदरील रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा. अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश चव्हाण, सचिन गिरकर, महेंद्र म्हाडगुत आदी उपस्थित होते.

Subscribe to my channel




