बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांचा वाढदिवस आरोग्य विषयक उपक्रमांनी साजरा

नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांचा ६० वा वाढदिवस सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांनी साजरा झाला. यानिमित्त राजकोट मित्रमंडळ आणि लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दैवज्ञ भवन, मालवण येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप शिबिर व रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरांचे उदघाटन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. रक्तदान शिबीरासाठी जिल्हा रक्त पेढी, ओरोस यांचे सहकार्य लाभले तर नेत्रतपासणीसाठी विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटर, कणकवली यांचे सहकार्य लाभले. यामध्ये ६६ जणांनी रक्तदान केले. तर यावेळी १५५ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी ७२ जण चष्मा वाटपसाठी पात्र ठरले असून त्यांना लवकरच चष्मे वाटप करण्यात येणार आहे, त्यासाठी तारीख व ठिकाण ठरविण्यात येईल, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

या शिबिरास अनेक मान्यवर व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून सहदेव बापर्डेकर यांना शुभेच्छा दिल्या. या शिबिरास नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती तथा लायन्स क्लबच्या सचिव पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेविका मेघा सावंत, लायन्स क्लब खजिनदार राधिका मोंडकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, राजु बिडये, बबन शिंदे, सुनील खांदारे, संतोष खांदारे, सोनू खांदारे, हेमंत चव्हाण, परशुराज पाटकर, बाळू अंधारी, जॉन नरोना, शेखर गाड, बबन रेडकर, अनिल कांदळकर, राजा शंकरदास, गणेश प्रभुलीकर, शांती पटेल, मुकेश बावकर, विश्वास गावकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, किसन मांजरेकर, नंदू देसाई, बाबा परब, संदीप गावकर, संजय नार्वेकर, पारितोष बापर्डेकर, हिमांशू बापर्डेकर, स्वप्नाली नेरुरकर, गीता बापर्डेकर, गौरी खांदारे, रूपा बिडये, मंदा जोशी, अनुष्का चव्हाण, मनाली दळवी, अंजली आचरेकर, जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, नंदिनी गावकर, राजकोट मित्र मंडळ आणि लायन्स क्लब ऑफ मालवणचे सर्व सभासद आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!