मालवण भाजपा कार्यालयात स्व. गोपीनाथ मुंडे स्मृती दिन साजरा

मालवण : मालवण शहरातील कोणार्क रेसिडन्सी येथील भाजपा कार्यालयात भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते स्व. मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, पूजा करलकर, पूजा सरकारे, माजी जि. प. सदस्य संतोष साटविलकर, भाऊ सामंत, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, महिला शहराध्यक्ष चारुशीला आचरेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, आबा हडकर, सुधीर साळसकर, दादा नाईक, निलेश खोत, प्रमोद करलकर, श्री. भोजने आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!