आ. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम ; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित



मालवण | कुणाल मांजरेकर
सध्या कडक उन्हाळ्याचे चटके बसत असून भर उन्हात मच्छिविक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या मालवण मधील ७५ मत्स्यविक्रेत्या महिलांना कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने गार्डन छत्र्या भेट म्हणून देण्यात आल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याहस्ते या छत्र्या सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, पालिकेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बाल कल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, सौ. भाग्यश्री मयेकर, मेघा गावकर, नीना मुंबरकर, शहर संघटक राजू बिडये, अभय कदम, निशय पालेकर, महेश सारंग, भाऊ मोर्जे, भाई मांजरेकर, विलास मुणगेकर, राजन परुळेकर, उमेश बिरमोळे, प्रशांत बिरमोळे, सूरज बिरमोळे, दिलीप बिरमोळे, बाळा माने, मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, मार्टिन फर्नांडिस, पूजा खरडकर, रणशिंग, संध्या परुळेकर, मीनल परब, अश्विनी परुळेकर, सौ. लुडबे, नंदिनी हडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महायुती संपर्क कार्यालयात सत्यनारायणाची महापूजा ठेवण्यात आली होती.

Subscribe to my channel




