रोटरी क्लब मालवण आयोजित मराठी शुद्धलेखन स्पर्धेत प्रा. सुमेधा नाईक प्रथम

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधुन आयोजन : गौरी पाटकर द्वितीय तर डॉ.रुपाली पंतवालावलकर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; बक्षीस वितरणानिमित्त १० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

मालवण | कुणाल मांजरेकर

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधुन रोटरी क्लब मालवण यांच्या वतीने १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी घेण्यात आलेल्या मराठी शुद्धलेखन स्पर्धेत प्रा. सुमेधा नाईक यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर गौरी पाटकर व डॉ. रुपाली पंतवालावलकर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. अस्मिता रावराणे आणि हर्षदा माने यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. या स्पर्धेत ५७ जणांनी सहभाग घेतला होता.

टोपीवाला हायस्कूलचे धामापूरकर सर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून सहकार्य केले. तर स्पर्धा आयोजनासाठी कन्याशाळेचे सहकार्य लाभले. विजेत्या सर्वांना रोख रक्कम व पहिल्या तीन क्रमांकाना चषक प्रदान करण्यात आले. सर्व स्पर्धकाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व बक्षिसे डॉ.अजित लिमये यांनी पुरस्कृत केली होती. बक्षीस समारंभ २७ फेब्रुवारी रोजी हॉटेल लिलांजली येथे पार पडला.

यावेळी रोटरी क्लब मालवण, भगीरथ प्रतिष्ठान, डॉ.प्रशांत कोलते, डॉ.विद्याधर तायशेटे यांच्या सहयोगातुन १० गरजु विद्यार्थ्याना सायकली देण्यात आल्या.यावेळी रोटरी अध्यक्ष रो. पंकज पेडणेकर, सेक्रेटरी रो. तांबे, डॉ प्रसाद देवधर, डॉ.प्रशांत कोलते, डॉ विद्याधर तायशेटे, डॉ अजित लिमये, रो.श्रीकृष्ण तारी, रो साळगावकर, रो. उमेश सांगोडकर, रो. अभय कदम, रो. वाक्कर, रो. वनकुद्रे, रो प्रविणा शिंदे, रो. प्रदीप सामंत, रो. सुविधा तिनईकर उपस्थित होते. सूत्रसंचालन रो. डॉ. लीना लिमये यांनी केले तर आभार रो. महादेव पाटकर यांनी मानले. प्रा सुमेधा नाईक व नंदिनी साटलकर यांनी मनोगत व्यक्त करत रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले.

error: Content is protected !!