
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह सहकारी मित्रपरिवार यांची उपस्थिती
मालवण : मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती व लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांचा ६० वा वाढदिवस सोमवारी सामाजिक उपक्रम, शुभेच्छा वर्षावासह आरोग्यसेवा उपक्रमांनी साजरा झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सेवानिवृत्ती जिल्हापरिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यानिमित्त राजकोट मित्रमंडळ आणि लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दैवज्ञ भवन, मालवण येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप शिबिर व रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरांचे उदघाटन मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. रक्तदान शिबीरासाठी जिल्हा रक्त पेढी, ओरोस यांचे सहकार्य लाभले तर नेत्रतपासणीसाठी विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटर, कणकवली यांचे सहकार्य लाभले. यामध्ये ६६ जणांनी रक्तदान केले. तर यावेळी १५५ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी 80 जण चष्मा वाटपसाठी पात्र ठरले असून त्यांना लवकरच चष्मे वाटप करण्यात येणार आहे, त्यासाठी तारीख व ठिकाण ठरविण्यात येईल, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. अनेक मान्यवर व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून सहदेव बापर्डेकर यांना शुभेच्छा दिल्या.
या शिबिरास नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्षा महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला व बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेविका मेघा सावंत, लायन्स क्लब झोन चेअरमन अनुष्का चव्हाण, सचिव पूनम चव्हाण, राधिका मोंडकर, मुकेश बावकर, गणेश प्रभुलकर, शांति पटेल, राजा शंकरदास, विश्वास गांवकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, बाळू अंधारी, जयश्री हडकर, स्वप्नाली नेरुरकर, वैशाली शंकरदास, रूपा कांदळगावकर, मनाली दळवी, दीक्षा गावकर, अंजली आचरेकर, मीना घुर्ये, फॅनी फर्नाडिस, नंदिनी गावकर, मनीषा गावकर, मिताली मोंडकर, युगांत चव्हाण, सचिन शरबिद्रे, उदय घाटवळ, शिवसेना पदाधिकारी मंदार लुडबे, राजु बिडये, बबन शिंदे, किसन मांजरेकर, सुनील खांदारे, संतोष खांदारे, सोनू खांदारे, कैलास खांदारे, हेमंत चव्हाण, परशुराज पाटकर, जॉन नरोना, अरविंद करलकर, शेखर गाड, बबन रेडकर, अनिल कांदळकर, सुदेश आचरेकर, नंदू देसाई, संदीप गांवकर, संजय नार्वेकर, अनिल कांदळकर, विजय ढोलम, हेमंत चव्हाण, संदीप गावकर, संजय नार्वेकर, पारितोष बापर्डेकर, हिमांशू बापर्डेकर, गीता बापर्डेकर, गौरी खांदारे, रूपा बिडये, मंदा जोशी, रणजीत खांदारे, रोहित कवटकर, विशाल मोडक, ओंकार पांगे, नागेश परब, भूषण परब, सागर खराडे, यश कवटकर, अथर्व काळसेकर, अथर्व चिंदरकर, कौशल जोशी, नवनीत लब्दे, बंटी खांदारे, भावेश खांदारे यांच्यासह राजकोट एक्वा स्पोर्ट चे सर्व सदस्य राजकोट मित्र मंडळ, महिला मंडळ आणि लायन्स क्लब ऑफ मालवणचे सर्व सभासद आदी उपस्थित होते.





Subscribe to my channel






