वैभव नाईक … निलेश राणेना आव्हान द्यायची भाषा कसली करता ?
ज्या दिवशी भास्कर नावाच्या शिखंडीला पुढे केला, त्याच दिवशी तुमचा पराभव निश्चित !
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा सणासणीत टोला
मालवण | कुणाल मांजरेकर
आगामी निवडणुकीत भाजपा नेते निलेश राणे यांना आपल्या विरोधात उभे राहण्याचे आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना भाजपाचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी सणसणीत टोला लगावला आहे. ज्या दिवशी भास्कर नावाची शिखंडी पुढे होती, त्याच दिवशी तुमचा पराभव निश्चित झाला असे सांगून मागील निवडणुकीत अपक्ष उभ्या असलेल्या नवख्या उमेदवारासमोर कोणत्याही पक्षाची निशाणी नसताना तुम्ही पडता पडता वाचला. आता तर भाजपच्या निशाणीवर निलेश राणे या निवडणूक रिंगणात असतील आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण सोबतीला असतील. त्यावेळी तुमचा गड एका झटक्यात उलथून कधी पडला, ते तुम्हालाही कळणार नाही, असं चिंदरकर यांनी म्हटलं आहे.
श्री. चिंदरकर यांनी म्हटले आहे की, सभ्यतेचे आव आणून तुम्ही नाथ पै, दंडवतेचा वारसा सांगता आणि राणे कुटुंबावर पर्यायाने भाजपवर गरळ ओकता. अगदी खालच्या पातळीवर टीका करता. ही दुटप्पी भूमिका जनता आता पुरती ओळखून आहे. आता पर्यंतची सगळी वृत्तपत्रे आणि सोशल मिडीयाची पाने चाळा, ती म्हणजे सुरुवात तुम्ही करता आणि शेवट राणे करतात. सेनेला त्याच भाषेत उत्तर आणि ऐक्शनला रिऍकशन राणे कुटुंबंच योग्य पद्धतीने देते आणि प्रत्येक कृतीवर तुम्हाला भारी पडते हेच तुमचं अवघड जागेच दुखणं आहे. त्यात नाईक साहेब भास्कर नावाची शिखंडी तुम्ही उभी करून वार करू पाहात होता, पण त्या चक्रव्यूहात तुमी पुरते अडकला आहात. कुडाळ मध्ये भास्कर जाधवाना आणून रण मारण्याच्या नादात तुम्हीच अडकलात. तुमची प्रॉपर्टी, तुमची चौकशी या सगळ्या नितिनियमाने चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. त्यात तुम्ही दोषी नाहीतर मालवण, कुडाळमध्ये लोकांना सांगावं का लागतं ? आणि कर नाही तर डर कशाला ? राहिला प्रश्न निलेश राणे यांचा. तुम्ही कोणत्या दाव्यावर सांगताय की निलेश राणेनी उभ राहून दाखवावं ? तुम्ही काल पडता पडता वाचला. कालावधी कमी, नवखी निशाणी. आता कमळ असणार आणि उमेदवार निलेश राणे असणार आणि या सगळ्या प्रक्रियेत ना. रवींद्र चव्हाण साहेब पण असणार. तेव्हा तुमचा गड एका झटक्यात उलथून पडलाच समजा.
तुमच्या राजकीय कारकिर्दीत किती सुरुंग तुम्हीच पेरले आहेत ते त्यात तुम्ही काही क्षणात परत कणकवली जाऊन घरी बसणार. घोडा मैदान लांब नाही. लोकांना विकास कामांच्या पत्रांची प्रत्येक निवडणुकीत खिरापती सारखी वाटलेली पत्रे आता त्या पत्राचं काय करणार ? आता तुमच्या हाती आमदार फंडा व्यतिरिक्त काय आहे ? त्या लोकांना कसे सामोरे जाणार ? तुम्ही दहशत आणि शिवराळ भाषा नावाचे अस्त्र हाती घेऊन फिरत होता, पण जेव्हा खालच्या पातळीवर इथे येऊन विकास पुरुषांवर टीका होती, त्याच दिवशी तुमच्या सभ्यतेचा बुरखा टाराटारा तुम्ही स्वतःच फाडून घेतला आणि तुम्हीच त्यात बूमरँग झालात. शिवराळ भाषा आणि दहशतीचं अस्त्र स्वतःवर पाडून घेतलात. आता पराभव अटळ आहे. आज विकास कामांची पत्र दिलेली लोक तुम्हाला शोधत आहेत, थोडया दिवसानी तुमचे साथीदार पण शोधत असतील आणि म्हणतील भास्कर आला आणि उदया ऐवजी अस्त करून गेला, असा टोला धोंडू चिंदरकर यांनी लगावला आहे.