युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर आणि सहकारी केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या भेटीला !

पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये घेतली भेट ; “या” महत्वपूर्ण समस्येकडे राणेंचे वेधले लक्ष

मालवण : कुणाल मांजरेकर

येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी रविवारी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये त्यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मत्स्यव्यवसाया समोरील अडचणींकडे लक्ष वेधून त्या सोडवण्याची मागणी केली. या संदर्भात लेखी निवेदन तयार करण्याची सूचना ना. राणे यांनी केली आहे.

सौरभ ताम्हणकर यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर पडवे येथे त्यांनी सहकाऱ्यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण यांच्यासह सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ना. राणे यांनी मालवण मध्ये युवकांचा मेळावा घेण्याची सूचना करून या मेळाव्याला आपण स्वतः उपस्थित राहण्याची ग्वाही दिली. यावेळी सौरभ ताम्हणकर यांनी मत्स्यव्यवसायातील अडचणी त्यांच्या समोर मांडल्या. सिंधुदुर्गच्या समुद्रात सुरु असलेल्या अनधिकृत मासेमारीकडे लक्ष वेधताना गोवा, गुजरात, कर्नाटक मधील अनधिकृत बोटी येथील समुद्रात बेकायदा मासेमारी करीत असून हा प्रश्न केंद्रशासन स्तरावर मांडून येथील मच्छीमारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. या बाबत सविस्तर निवेदन देण्याची सूचना ना. राणे यांनी केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!