गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपचा पुढाकार!

युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी तालुक्यात पूजा साहित्य वाटप

सावंतवाडी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडी तालुक्यात विशेष उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या पुढाकाराने सावंतवाडी, बांदा आणि आंबोली मंडलातील सर्व बूथ अध्यक्ष तसेच शक्ती केंद्रप्रमुखांना पूजा साहित्याच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

गणेशोत्सव हा कोकणातील श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव मानला जातो. या पार्श्वभूमीवर भाविकांना पूजेसाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि उत्सवाच्या काळात सेवाभावाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. मंडलातील विविध बूथच्या माध्यमातून या पूजा साहित्याच्या पिशव्या भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात भाविकांना स्थानिक पातळीवर आवश्यक पूजासाहित्य उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमावेळी जि. प. सदस्य नितीन राऊळ, कास सरपंच प्रविण पंडीत, बाळा जाधव, संतोष बिले, स्वप्नील राऊळ, केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, बंटी जामदार, विजू साटेलकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक परंपरांसोबतच सामाजिक सहभाग आणि सेवाभावाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

error: Content is protected !!