श्री स्वराज्य सक्षम सेवा प्रतिष्ठान आणि स्वीट सेलिब्रेशन केक शॉप, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम
मालवण : महिलांना स्वावलंबी बनवून त्यांच्या रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे’ टाकत श्री स्वराज्य सक्षम सेवा प्रतिष्ठान आणि स्वीट सेलिब्रेशन केक शॉप, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे ‘केक आणि आईस्क्रीम मेकिंग तसेच ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण’ वर्गाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणादरम्यान सहभागी महिला व युवतींना विविध प्रकारचे केक, पेस्ट्रीज, डिझायनिंग तसेच वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम घरच्या घरी अत्यंत व्यावसायिक दर्जाचे कसे बनवावे, याचे परिपूर्ण मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागी प्रशिक्षणार्थीना संस्थेच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण वर्ग देखील आयोजित करण्यात आला आहे.
गृहउद्योगाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या सुवर्णसंधीचा मालवण व परिसरातील जास्तीत जास्त महिला व युवतींनी लाभ घ्यावा, केक आणि आईस्क्रीम मेकिंगच्या अधिक माहितीसाठी ९४०४३५५३१४ तर ज्वेलरी मेकिंगसाठी ९३२६४७७००७ येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री स्वराज्य सक्षम सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. शिल्पा यतीन खोत व स्वीट सेलिब्रेशन केक शॉपच्या सौ. स्नेहल संदीप परब यांनी केले आहे.