मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन वायरी भुतनाथ येथील अनेक तरुणांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. दरम्यान, प्रवेशकर्ते प्रशांत महाबळेश्वर तोडणकर यांची शिवसेना वायरी बुथ क्र. 111 याठिकाणी शाखाप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, वायरी विभागप्रमुख मंदार लुडबे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रशांत महाबळेश्वर तोडणकर, करण तोडणकर, मंदार आडकर, सागर तोडणकर, अक्षय मेथर, भावेश तोडणकर, ऋषिकेश तोडणकर, युवराज तोडणकर, स्वरूप मोर्जे, यश खोबरेकर, आनंद ढोके, रोहित चांदेकर, सुरज मोंडकर, प्रतीक मालंडकर, आकाश मोंडकर यांसह अन्य सहकारी उपस्थित होते. यांनी शिवसेनेत प्रवेश केला.