मालवण, कुडाळ मधील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा आ. कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते सत्कार

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

मालवण : मालवण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा मुंबई वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते व कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथील निलरत्न निवासस्थानी पार पडला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव, नीना मुंबरकर, मेघा गावकर, भाग्यश्री मयेकर, शर्वरी पाटकर तसेच जि प सदस्य दादा साईल, रुपेश कानडे, दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, निखिल कांदळकर यांच्यासह कुडाळचे अन्य लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!